माता रमाई जयंती 2024   निमित्त रमाबाईंच्या विषयी जाणून घेऊया.

माता रमाईंचा जन्म  ७ फेब्रुवारी १८९८ ला वणंद, ता- दापोली, जि- रत्नागिरी येथे झाला.

रमाबाईंच्या आईचे नाव रुक्मिणी होते व वडिलांचे नाव भिकू धुत्रे होते.

सन १९०६ मध्ये रमाबाईंचा विवाह भीमराव रामजी आंबेडकर यांच्यासोबत झाला.

रमाबाईंनी कोणतीही तक्रार न करता डॉ. बाबासाहेबांना आयुष्यभर साथ दिली.  स्वतः कष्ट करून कुटुंब सांभाळले.

रमाबाईंना डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रेमाने रामू म्हणत.

रमाबाई यांना वंदन करण्यासाठी देशभरातून लोक ७ फेब्रुवारीला त्यांच्या जन्मगावी  वणंद येथे येतात.

डॉ. बाबासाहेबांच्या यशामध्ये माता रमाई यांचा मोलाचा वाटा आहे. 

रमाबाई भीमराव आंबेडकर यांचे निधन २७ मे १९३५ मध्ये दादर, मुंबई येथे झाले.