Site icon Chhoti Khabar

Digital 7/12 Utara: काढा 5 मिनिटात ते ही घरबसल्या !

Digital 7/12 Utara

Digital 7/12 Utara: Digital 7/12 Utara  किंवा ८ अ उतारा हे जमीन महसूलाचा मुख्य पुरावा मानले जाते. तुमच्या नावाचा ७/१२ किंवा ८ अ आहे म्हणजे तुम्ही शेतकरी किंवा जमिनीचे मालक आहात. पण तुम्हाला माहीत आहे का तुमचा ७/१२ व ८ अ तुम्ही तुमच्या मोबाईल किंवा लॅपटॉपवर घरबसल्या पाहू शकता व Digital 7/12 Utara काढूही शकता. नसेल तर आज आपण याविषयी या लेखात पाहणार आहोत त्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाच्या अधिकृत वेबसाईट ला भेट द्यावी लागेल. महसूल विभागाची https://bhulekh.mahabhumi.gov.in/ ही अधिकृत वेबसाईट type करून सर्च करा.

आता तुमच्यासमोर असे पेज उघडेल. येथे तुम्हाला दोन पर्याय दिसतील.

  1. 7/12 Utara / 8अ/ प्रॉपर्टी कार्ड : पहा विना चार्ज
  2. Digital 7/12 Utara

7/12 UTARA /8अ/ प्रॉपर्टी कार्ड : पहा विना चार्ज

येथे आल्यानंतर तुम्हाला आपली चावडी हा ऑप्शन निवडायचा आहे. त्यानंतर आपला योग्य  विभाग निवडा व GO वर क्लिक करा. .

तुम्हाला जर मालमत्ता पत्रक हवे असेल तर जिल्हा,भूमी अभिलेख विभाग निवडा, गाव, CTS No. भरा किंवा नावानुसार शोधूनही मालमत्ता पत्रक पाहू शकता.

Digital 7/12 Utara कसा काढावा?

येथे तुम्हाला पहिला ऑप्शन Digital Signed 7/12 Utara हा पर्याय निवडायचा आहे. Digital 7/12 Utara 2 प्रकारे काढता येतो.

  1. OTP Based Login
  2. User ID Password तयार करून Login

Digital 7/12 Utara साठी OTP Based Login

हा पर्याय सिलेक्ट करा.  तुमचा मोबाईल नंबर प्रविष्ट करा आणि OTP पाठवा वर क्लिक करा. तुमच्या मोबाईलवर एक OTP सेंड केला जाईल तो भरून Verify OTP वर क्लिक करा. या प्रकारे आपण लॉगीन करू शकतो. ही अत्यंत सोपी पद्धत आहे.

User ID Password तयार करून Login

लॉगीन करण्यासाठी आपल्याला एकदाच Id Password तयार करावा लागेल. तो टाकून केंव्हाही loginकरता येते.

Digital 7/12 Utara साठी Recharge कसे करावे?

7/12 UTARA /8अ/ प्रॉपर्टी कार्ड: काढा डिजिटल स्वाक्षरीत

तुम्हाला तुमच्या Login प्रमाणे Login करून घ्यायचे आहे.

  1. Digital 7/12 Utara असेल तर 

2 .  Digital 8 अ असेल तर 

3.    फेरफार हवा असेल तर.

फेरफार म्हणजे काय तर जमिनीचा मालकी हक्क केंव्हा बदलला, जमिनीवर बोजा नोंदवला गेला तसेच जमिनीचे हस्तांतरण कोणाकडून कोणाकडे केंव्हा झाले याची सर्व माहिती फेरफार नोंदी मध्ये दिलेली असते. त्यासाठी तुम्हाला फेरफार नंबर माहित असणे आवश्यक आहे. आणि फेरफार कसा काढावा हे आपण पाहू.

कडबा कुट्टी यंत्र हवंय?: मग 2024 साठी असा करा अर्ज!

४ .  ७/१२ चा नकाशा कसा पाहावा.

जर तुम्हाला तुमची जमीन कुठे आणि कोणत्या आकाराची आहे तसेच तुमच्या शेतीच्या आजूबाजूला कोणाची जमीन आहे हे पहायचे असेल तर तुम्ही mahabhunaksha.mahabhumi.gov.in या वेबसाईट ला भेट देऊन तुमच्या जमिनीचा नकाशा तुम्ही पाहू शकता.

५ .  प्रॉपर्टी कार्ड हवे असेल तर 

प्रॉपर्टी कार्ड म्हणजे काय तर तुमच्या नावे असलेली बिगर शेती असलेली मिळकत त्या जागेची सर्व माहिती प्रॉपर्टी कार्ड म्हणजे  मालमत्ता पत्रक मध्ये असते

६.  Payment History 

या पर्यायामध्ये तुम्ही कोणत्या दिनांकास कोणता ७/१२, ८ अ किंवा प्रॉपर्टी कार्ड काढले याची गाव, तालुका, जिल्हा तसेच तुम्हाला किती चार्ज लागला याची पूर्ण माहिती मिळते.

६.    Payment Status 

या पर्यायामध्ये तुम्ही उताऱ्या साठी केलेल्या रिचार्जची माहिती जसे रक्कम, तारीख Payment Gateway याची माहिती मिळते.

Exit mobile version