नवीन वीज कनेक्‍शन आता घरबसल्या घ्या! कसे?

नवीन वीज कनेक्‍शन आजच्या जीवनात ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. तुमच्या घरात टीव्ही, मोबाईल, मिक्सर, रेफ्रिजरेटर, वॉशिंग मशिन, कॉम्प्युटर, लॅपटॉप, मायक्रोवेव्ह अशा अनेक गोष्टी आयुष्यासाठी अत्यावश्यक आहेत. आजकाल वाहने सुद्धा इलेक्ट्रिक झाली आहेत. आणि शेतीसाठी लाईट खूपआवश्यक आहे. आज आपण पाहूया घरगुती वीज कनेक्‍शन साठी काय करावे आणि कुठे अर्ज करावा ? हा फॉर्म आपण मराठी किंवा English मधून घरबसल्या भरू शकतो.

नवीन वीज कनेक्‍शन साठी कुठे अर्ज करावा ?

जर तुमच्या घरी लाईट कनेक्शन घ्यायचे असेल,तर तुम्ही तुमच्या मोबाईल,लॅपटॉपवरून घरी बसून अर्ज करू शकता. महावितरणच्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल. त्यासाठी येथे क्लिक करा.तुम्हाला असा इंटरफेस दिसेल.

नवीन वीज कनेक्‍शन
लाईट कनेक्‍शन

 

सर्व माहिती काळजीपूर्वक वाचायची आहे. आता तुम्हाला पाच पर्याय दिसतील त्यातील पुढीलप्रमाणे योग्य पर्याय निवडा.

  • बिगर औद्योगिक हा पर्याय निवडायचा आहे.
  • पहिला 01-LT SUPPLY हा पर्याय निवडा.
  • मागितलेली सुविधांमध्ये तुम्हाला New Connection (Permanent) किंवा New Connection (Temporary) यातील योग्य तो पर्याय निवडायचा आहे.
  • अर्जाची तारीख आपोआप येऊन जाईल.
  • जीएसटी क्रमांक भरण्याची आवश्यक नाही.

नवीन वीज कनेक्‍शन अर्जाची सविस्तर माहिती

  • नाव /कंपनीचे नाव यामध्ये तुम्हाला मिस्टर/मिसेस/श्रीमती यातील एक निवडायचे आहे. त्यानंतर तुम्हाला प्रथम नाव, मधले नाव आणि आडनाव लिहायचे आहे.
  • पूर्ण नाव आपोआप येऊन जाईल.
  • व्यवसाय मध्ये तुम्हाला सर्विस/प्रोफेशन किंवा बिजनेस कि इतर हे निवडायचे आहे.
  • अर्जदाराची वर्गवारी ओपन/ओबीसी/एससी/एसटी यापैकी योग्य पर्याय निवडा.
  • त्यानंतर लिंग निवडा.
  • तुमचा नजीकचा ग्राहक क्रमांक तुम्हाला टाकायचा आहे. म्हणजेच तुमच्या शेजारच्या व्यक्तीचा ग्राहक क्रमांक.
  • आता तुम्हाला जागा/घर क्रमांक किंवा इमारतीचे नाव,पत्ता जागेची खून प्रत्येकी पन्नास शब्दांमध्ये लिहायचे आहे.
  • आता तुमचा जिल्हा तसेच तालुका तसेच गाव निवडा व पिनकोड नंबर निवडा.
  • तुमचा भ्रमणध्वनी म्हणजे मोबाईल नंबर टाका.
  • आता तुमचा ईमेल भरा व ओटीपी सत्यापित करा तुमच्या मोबाईलवर एक ओ टी पी पाठवला जाईल तो टाका व व्हेरिफाय ईमेल ओटीपी वर क्लिक करा.
  • आता तुमचा बारा अंकी आधार नंबर टाकायचा आहे.

PM Kisan Registration number :5 मिनिट में कैसे निकाले?

नवीन वीज कनेक्‍शन बिलाची माहिती

बिलाची माहिती यामध्ये तुम्हाला बिलाचा आणि मीटरचा पत्ता सारखा असेल तर दिलेल्या चेक बॉक्समध्ये टिक करा आणि वेगळा असेल तर तो भरून घ्या.

  • आता तुम्हाला जागेचा प्रकार निवडायचा आहे जसे मालकीची, भाड्याची, भाडेपट्टी की आणखी कोणत्या कारणासाठी.
  • ग्राहकाचा उपप्रकार  निवडायचा आहे पहिला पर्याय निवासी हे निवडा.
  • उपप्रकार – मध्ये वर्ग निवडलेला आहे तोच येऊन जाईल.
  • क्रिया गटप्रकार निवडा – त्यामध्ये तुम्हाला तुमच्या घरानुसार पर्याय निवडायचा आहे.
  • क्रिया – यामध्ये सुद्धा तुमच्या घरानुसार पर्याय निवडा.

मला ग्रो ग्रीन सर्विस ची निवड करायची आहे ? होय/ नाही निवडा. होय निवडल्यायास मध्ये आपणाला फक्त online बिल पाठवले जाते. त्या बदल्यात आपल्या बिलामध्ये १० रुपये कामी केले जातात. आपल्या बिल प्रत्यक्ष हवे असल्यास नाही हा पर्याय निवडा.

बहुपक्षीय त्रिपक्षीय ग्राहक आहे का ? तर नाही निवडा.

कृपया पेमेंट साठी पर्याय निवडा. यामध्ये तुम्हाला फक्त प्रक्रिया शुल्क हाच पर्याय निवडायचा आहे.

  • Required Load माहित नसेल तर पुढे दिलेल्या Click Here यावर क्लिक करा.त्यानंतर तुमच्या घरी जी उपकरणे आहेत ती

लिहा Required Load आपोआप येवून जाईल.

  • Contract Demand मध्ये 0 करा.०००००००० ०००००००
  • Supply Type मध्ये सिंगल / थ्री फेज निवडा.

दिलेल्या अटी मला मान्य आहेत या समोरील चेक बॉक्स मध्ये टीक करून ठिकाण लिहा व ओटीपी व्युत्पन्न करा वर क्लिक करा. तुमच्या मोबाईल व ईमेल वरती एक ओटीपी पाठवला जाईल तो ओटीपी भरून नोंद करा (Save) वर क्लिक करा.

तुमच्या समोर एक Application ID जनरेट होईल तो लिहून घ्यायचा आहे. व OK वर क्लिक करा.

नवीन वीज कनेक्‍शन आवश्यक कागदपत्रे

  1. आधार कार्ड, पॅनकार्ड, मतदान कार्ड, लायसन्स, पासपोर्ट यापैकी किमान १
  2. रेशन कार्ड, असिसमेंट, 200 रुपयाचा स्टँपवर प्रतिज्ञापत्र, खरेदी-विक्री करारपत्र यापैकी किमान एक
  3. टेस्ट रिपोर्ट+फोर्म डी अपलोड करा.

आता तुमच्यासमोर सर्व माहिती येईल तिथे Upload Document ला क्लिक करा.

  • तुमचा रजिस्टर मोबाईल नंबर टाका.
  • E- mail असेल तर टाका.
  • Identity Proof मध्ये कोणताही एक पुरावा निवडा व अपलोड करा
  • Ownership /Address Proof मध्ये तुम्ही एक पुरावा निवडा व अपलोड करा
  • Test Report For Connection येथे तुम्ही

Upload All Document यावर क्लिक करा. Document Uploaded Sucessfuly असा मेसेज येईल.

आता तुमच्यासमोर नवीन पेज येईल येथे Application No. किंवा mobile No.टाकायचा आहे व Captcha भरून Click Here वर क्लिक करायचे आहे. तुमच्या मोबाइल वर OTP येईल तो OTP भरून Submit वर क्लिक करा. तुमची अर्जाची प्रिंट Open होईल त्याची प्रिंट काढून घ्यायची आहे.

  • खाली आल्यावर दोन पर्याय दिसतील त्यातील Only Processing Fee  ला निवडा Confirm Choice करून पुढे जा.
  • सर्वात खाली आल्यावर I Accept Term and Condition क्लिक करून नंतर Pay Now वर क्लिक करा.
  • आलेल्या पर्यायातून योग्य पर्याय निवडा.व Payment Gateway निवडा आणि Submit वर क्लिक करा.
  • जर तुम्ही UPI निवडले तर तुम्हाला तुमच्या स्क्रीनवर स्कॅनर येईल तो स्कॅन करून पेमेंट करून घ्या.

पेमेंट Successful झाल्यावर तुम्हाला पेमेंट Receipt प्राप्त होईल त्याची प्रिंट काढून घ्यायची आहे व असणारे सर्व कागदपत्रे आणि अर्जाची प्रिंट तुमच्या जवळच्या महावितरणच्या कार्यालयात द्यायची आहेत.

धन्यवाद!

 

 

 

 

 

Leave a Comment