NMMS Exam result 2024 जाहीर! आपण पाहिलात काय?

NMMS Exam result 2024 : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्यामार्फत इयत्ता आठवी करिता राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती परीक्षा (NMMS Exam) आयोजन केले जाते. सन 2023- 24 मध्ये ही परीक्षा रविवार दिनांक 24 डिसेंबर 2023 रोजी घेण्यात आली होती. या परीक्षेचा निकाल ( NMMS Exam result 2024 ) महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्या संकेतस्थळावर 7 फेब्रुवारी 2024 रोजी जाहीर करण्यात आला आहे.

NMMS Exam result कसा पहावा?

राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल NMMS Exam result सात फेब्रुवारी 2024 रोजी संकेतस्थळावर जाहीर करण्यात आला आहे. हा रिझल्ट आपण आपल्या मोबाईल मध्ये कसा पाहायचा हे पाहूया.

  • सर्वप्रथम आपल्या फोन मधील ब्राउझर ओपन करा.
  • ब्राउझर ओपन केल्यानंतर सर्च बॉक्समध्ये आपल्याला https://nmmsmsce.in हे अधिकृत संकेतस्थळ टाईप करा. त्यानंतर सर्च करा.
  • सर्च केल्यानंतर आपल्यासमोर नवीन पेज ओपन होईल त्यामध्ये वर्ष 2023- 24  यावर क्लिक करा.
  • त्यानंतर आपल्यासमोर राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती परीक्षेचा मुख्य पेज ओपन होईल.
  • त्या पेज वरती आपल्याला रिझल्ट नावाची एक टॅब दिसून येईल.
  • आपला NNMS Exam result पाहण्यासाठी रिझल्ट या त्यावर क्लिक करायचे आहे.
  • या ठिकाणी आपल्याला सुरुवातीला काही सूचना दिसून येतील. त्या सूचनांचे वाचन करा आणि त्यानंतर त्या खाली आपली माहिती भरा.
  • माहिती भरण्यासाठी जो पहिला बॉक्स आहे Enter your seat no. यामध्ये आपल्याला आपला परीक्षेतील बैठक क्रमांक म्हणजेच सीट नंबर भरावयाचा आहे.
  • त्याखालील दुसऱ्या बॉक्समध्ये Enter your mother name तुम्हाला तुमच्या आईचे नाव टाईप करायचे आहे.
  • दोन्ही बॉक्समध्ये भरलेली माहिती बरोबर असल्याची खात्री करून सबमिट यावर क्लिक करा.
  • त्यानंतर आपल्यासमोर आपला निकाल दिसून येईल.

अशा प्रकारे आपण आपला NNMS Exam result 2024 घरबसल्या पाहू शकता.

NMMS Exam result दुरुस्ती

NMMS Exam result पाहताना त्यामध्ये नोंदवलेली माहिती अचूक असल्याबाबतची खात्री करा. यामध्ये आपले पूर्ण नाव, जन्मतारीख, जात आणि आधार नंबर ही माहिती अचूक असणे खूप आवश्यक आहे.

जर आपल्यावरील माहितीमध्ये कोणतीही चूक असल्यास त्यामध्ये दुरुस्ती करून घेणे अत्यावश्यक आहे. यामध्ये विद्यार्थ्यांचे नाव, वडिलांचे नाव, आडनाव, आईचे नाव यामधील स्पेलिंग दुरुस्ती असल्यास (कोणत्याही परिस्थितीत पूर्ण नावात बदल केला जाणार नाही.) तसेच जन्मतारीख, जात, आधारकार्ड, इत्यादीमध्ये दुरुस्ती असल्यास सदर दुरुस्ती करण्यासाठी दि. १६.०२.२०२४ पर्यंत संबंधित शाळेच्या लॉगिनमध्ये ऑनलाईन अर्ज उपलब्ध करून देण्यात आलेला आहे.

सदरची दुरुस्ती आपल्या शाळेच्या लॉगिन मध्ये 16 फेब्रुवारी पर्यंत करता येणार आहे. सदर दुरुस्तीसाठी ऑनलाईन अर्ज सादर करावयाचा आहे.

आलेल्या सर्व दुरुस्त्यांचा विचार करून शिष्यवृत्तीसाठीची निवड यादी परिषदेच्या संकेतस्थळावर यथावकाश जाहीर करण्यात येणार आहे. सदर परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना कार्बनलेस उत्तरपत्रिका देण्यात आलेली असल्याने पेपरची फेर गुणपडताळणी केली जात नाही. शिष्यवृत्तीसाठीची निवड यादी जाहीर झाल्यानंतर निवडयादीत कोणताही बदल करण्यात येणार नाही.
सदर परीक्षेसाठी उत्तीर्ण होण्यासाठी दोन्ही विषयात एकत्रित ४० % गुण मिळणे आवश्यक आहेत. (अनुसूचीत जाती (SC) / अनुसूचीत जमाती (ST) व दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी दोन्ही विषयात एकत्रित ३२ % गुण मिळणे आवश्यक आहेत)
ज्या विद्यार्थ्यांचे प्रथम नाव / वडिलांचे नाव व आडनाव यामध्ये पूर्ण बदल होत असेल अशा विद्यार्थ्यांचे निकाल राखीव ठेवण्यात येत आहे.

NNMS Exam result उत्तीर्ण झाल्यास किती शिष्यवृत्ती मिळते?

सन 2007-08 पासून राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती योजना NMMS सुरू करण्यात आली आहे. आर्थिक दृष्ट्या दुर्बल असलेल्या हुशार विद्यार्थ्यांना पुढील शिक्षण घेताना आर्थिक सहाय्य व्हावे यासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे.

इयत्ता आठवी मध्ये शिकणारे विद्यार्थी या परीक्षेला बसू शकतात. परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांचे सर्व मार्गाने मिळून एकूण उत्पन्न तीन लाख 50 हजार पेक्षा कमी असणे आवश्यक आहे.

या परीक्षेमध्ये उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रति महीना 1000 रुपये या दराप्रमाणे वर्षाला बारा हजार रुपये मिळतात. इयत्ता नववी पासून बारावी पर्यंत विद्यार्थ्यांना दरवर्षी 12000 रुपये याप्रमाणे एकूण  48 हजार रुपये शिष्यवृत्ती मिळते.

या शिष्यवृत्तीचा लाभ आर्थिक दृष्ट्या मागास असणाऱ्या विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन देण्यासाठी उपयुक्त ठरतो. प्रज्ञावंत विद्यार्थी आर्थिक कारणांमुळे शिक्षणापासून दूर जाऊ नये, त्यांच्या शिक्षणामध्ये खंड पडू नये यासाठी त्यांना प्रोत्साहन पर ही शिष्यवृत्ती शासनामार्फत दिली जाते.

यावर्षी ही परीक्षा 24 डिसेंबर 2023 रोजी घेण्यात आली होती. या परीक्षेचा निकाल 7 फेब्रुवारी 2024 रोजी ऑनलाइन प्रसिद्ध करण्यात आला आहे. आपण वेळेत NMMS Exam result हा निकाल पाहून घेणे आपल्या निकालातील सर्व आवश्यक माहिती तपासून पाहणे खूप आवश्यक आहे.

जर आपले नाव जन्मतारीख किंवा इतर माहिती मध्ये दुरुस्ती करावयाचे असल्यास आपण 16 फेब्रुवारी पूर्वी आपल्या शाळेमार्फत ही दुरुस्ती सादर करणे आवश्यक आहे. दुरुस्ती बाबतचे अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीनेच करता येणार आहेत.

scholarship exam 2024

Leave a Comment