How to apply to New Voter Card Registration for 2024

New Voter Card म्हणजे मतदान कार्ड हे भारत निर्वाचन आयोग यांच्याकडून दिला जाणारा महत्त्वाचा असा ओळखीचा आणि पत्त्याचा पुरावा आहे. मतदान कार्ड काढण्यासाठी तुम्ही अठरा वर्ष पूर्ण केलेली असणे अत्यंत आवश्यक आहे मतदान कार्ड काढण्यासाठी तुम्ही तुमच्या  मोबाईल मधून घरबसल्या New Voter Card Registration व मतदान कार्ड मागणी साठी अर्ज करू शकता. त्यासाठीची सर्व माहिती आज आपण पाहणार आहोत.

New Voter Card Registration: उपयोग

 • मतदान कार्ड हा ओळखीचा ,पत्याचा पुरावा मानला जातो.
 • तुमच्याकडे मतदान कार्ड आहे म्हणजे तुम्ही मतदानाचा हक्क बजावू शकता.
 • मतदान कार्ड हे सरकारी कामासाठी लागणारे महत्वाचे ओळखपत्र आहे.
 • तुमचे मतदान कार्ड हे तुमच्या मुलांच्या व पत्नीच्या New Voter Card Registration साठी महत्वाचे आहे.

New Voter Card Registration साठी आवश्यक कागदपत्रे

वयाचा पुरावा    :-

 • आधार कार्ड
 • जन्म दाखला
 • पॅनकार्ड
 • ड्रायव्हिंग लायसन्स
 • १०th/ १२ th बोर्डशीट
 • पासपोर्ट

वरीलपैकी एक पुरावा आवश्यक आहे.

  पत्त्याचा पुरावा   : –

 • पाणी बील
 • लाईट बील
 • आधार
 • गॅस कनेक्शन बुक
 • बँक पासबुक
 • भाडे करार
 • घर खरेदी पत्रक

वरीलपैकी एक पुरावा आवश्यक आहे.

तसेच मोबाईल नंबर , E -mail ID , फोटो, नातेवाईक जसे आई/वडील/पती यापैकी एकाचे मतदान कार्ड नंबर ही आवश्यक आहे.

New Voter Card Registration कसे करावे?

 • New Voter Card Registration साठी तुम्हाला google play store वरून Voter Helpline हे app  इंस्टाल करून घ्यायचे आहे.
 • App उघडल्या नंतर app च्या वापरा संदर्भात नियम व अटी मान्य म्हणून दिलेल्या चेक बॉक्स मध्ये टिक करा.
 • मग तुम्हाला aap ची भाषा निवडायची आहे.
 • आता तुम्ही न्यू युजर वर क्लिक करा आणि तुमचा मोबाईल नंबर टाका आणि सेंड ओटीपी वर क्लिक करा तुमच्या दिलेल्या मोबाईलवर OTP येईल.
 • तो ओटीपी समोर आलेल्या पानावर Enter OTP च्या जागी भरा.
 • खालच्या रकान्यात E-mail टाका आता तुम्हाला पासवर्ड टाकायचा आहे ज्यामध्ये किंवा सहा अक्षरे असावी त्यामध्ये 0 ते ९ किमान एक अंक तसेच किमान एक स्पेशल कॅरेक्टर आणि किमान एक अक्षर कॅपिटल असायला हवं आणि पुन्हा पासवर्ड करून घ्या आणि सबमिट वर क्लिक करा.

आपले सरकार पोर्टल वर रजिस्ट्रेशन करा आता ५ मिनिटात.

 • नवीन पेज येईल तुमचा मोबाईल नंबर टाका आणि सेंड ओटीपी वर क्लिक करा.
 • तुम्ही दिलेल्या मोबाईलवर एक OTP येईल. OTP भरून खाली पासवर्ड च्या जागी तुम्ही तयार केलेला पासवर्ड टाका व लॉगिन वर क्लिक करा.
 • आता तुमचे लॉगिन यशस्वी झालेले आहे याच लॉगिन ने तुम्ही VOTER SERVISE PORTAL वर देखील लॉगिन करू शकता या वेबसाईटच्या सुविधांचा तुम्ही लाभ घेऊ शकता.

NEW VOTER CARD

Voter Helpline login नंतरचे टप्पे

पहिले पान:- येथे तुमचे राज्य, जिल्हा, तालुका निवडा,  जन्मतारीख भरा आणि जन्मतारीख बाबत पुरावा निवडा व खाली अपलोड वर क्लिक करा व तुमच्या फोल्डर मधून तुमची फाईल निवडा आणि नेक्स्ट वर क्लिक करा.

दुसरे पान :- आता तुम्हाला तुमचा पासपोर्ट साईज फोटो अपलोड करायचा आहे. फोटोची साईड 2Mb पर्यंत असावी.  नंतर जेंडर सिलेक्ट करा आणि खाली तुमचं नाव आणि वडिलांचे नाव भरा त्यानंतर सरनेम म्हणजे आडनाव भरून घ्या दोन्ही नावे मराठी मध्ये ऑटोमॅटिक येऊन जाईल.

आधार नंबर मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी भरून घ्या. रिलेटिव मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी आवश्यक नाही डिझाबिलिटी म्हणजे अपंगत्व असेल तर सिलेक्ट करा नसेल तर नेक्स्ट बटन वर क्लिक करा.

तिसरे पान :- येथे तुमच्या नातेवाईकाचे पूर्ण नाव भरा. मराठी मध्ये आपोआप येवून जाईल. ते चेक करा व नातेवाईकाचे मतदान कार्ड नंबर टाकून घ्या आणि नात्याचा संबंध सिलेक्ट करा व नेक्स्ट करा.

चौथे पान : – पत्त्याचा पुरावा 

 • House No./Appartment
 • Street /Area/Locality/ Mohalla / Road
 • Town/ Village
 • Post Office
 • Pincode
 • Tehsil/Taluka

सर्व माहिती भरून झाल्यावर पत्याच्या पुराव्याचे कागदपत्र निवडा आणि Upload वर क्लिक करून तुमची फाईल निवडून Upload करून घ्या.

 पाचवे पान : –

या पानावर तुम्ही फक्त  Name of applicant च्या बॉक्समध्ये तुमचं पूर्ण नाव टाकायचं आहे आणि Done वर क्लिक करायच आहे. तुम्ही भरलेला पूर्ण फॉर्म open होईल तो चेक करून घ्या आणि SUBMIT वर क्लिक करा. तुम्हाला एक Reference Id Number येईल तो लिहून ठेवा किंवा स्क्रीन शॉट काढून घ्या. आता OK वर क्लिक करा. NEW VOTER CARD येईपर्यंत हा नंबर जपून ठेवायचा आहे. तुम्ही आता मुख्य पृष्ठावर याल. डाव्या बाजूला Explore वर क्लिक करा व status of application वर क्लिक करा पुढे तुमचा Reference Id Number टाका राज्य सिलेक्ट करा Track status वर क्लिक करा तुमचे application या चार स्टेप मध्ये कोणत्या स्टेपला आहे ते दिसेल.

१.Submitted               2. BLO Appointed               3.Field Verified            4.Accepted/Rejected 

काही दिवसांनी तुमचे NEW VOTER CARD पोस्टाने तुमच्या घरी येईल.

 

Leave a Comment