नेताजी सुभाष चंद्र बोस जयंती भाषण

आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक महान नेत्यांनी आपल्या प्राणाचे बलिदान दिले तुरुंगवास भोगला. नेताजी सुभाष चंद्र बोस हे स्वातंत्र्य लढ्यातील एक महत्त्वाचे स्वातंत्र्य सेनानी आहेत. जानेवारी महिन्यात 23 तारखेला येणाऱ्या नेताजी सुभाष चंद्र बोस जयंती व त्यांचे स्वातंत्र्य लढ्यातील महत्व, कार्य या बाबत आज आपण जाणून घेणार आहोत.

नेताजी सुभाष चंद्र बोस हे एक जहाल मतवादी नेते व थोर स्वातंत्र्य सेनानी होते. त्यांना 1942 साली भारतीय अधिकारी व जर्मन अधिकारी नेताजी म्हणून लागले. आज त्यांना पूर्ण भारत देश नेताजी म्हणून ओळखत आहे. त्यांच्या वडिलांचे नाव जानकीनाथ व आईचे नाव प्रभावती असे होते. त्यांना ७ भाऊ व ६ बहिणी होत्या.

नेताजी सुभाष चंद्र बोस जयंती

नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या जीवनातील महत्त्वाच्या घटना

  • नेताजी सुभाष चंद्र बोस यांचा जन्म : 23 जानेवारी 1897 ओरिसामध्ये कटक येथे झाला.
  • नेताजी सुभाष चंद्र बोस शिक्षण : सुभाष बाबू यांचे शिक्षण स्कॉटिश चर्च कॉलेज कटक येथे झाले व 1921 साली ते भारतीय नागरी सेवा परीक्षा उत्तीर्ण झाले.
  • महात्मा गांधीजी यांची भेट : 20 जुलै 1921 रोजी मनीभवन या ठिकाणी सुभाष चंद्र बोस व गांधीजी यांची भेट झाली.
  • सायमन कमिशन विरोध : 1928 साली कोलकत्त्यात सायमन कमिशन विरोधी आंदोलनाचे नेतृत्व त्यांनी केले.
  • तिरंगा ध्वज मोर्चा : 26 जानेवारी 1931 या दिवशी कोलकत्यात एक विराट मोर्चाचे नेतृत्व हातात तिरंगा घेऊन केले.
  • काँग्रेस अध्यक्ष :  1938 साली काँग्रेसचे 51 वे वार्षिक अधिवेशन हरिपुरा येथे झाले तेव्हा त्यांची काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून निवड झाली.
  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची भेट : 22 जुलै 1940 मध्ये मुंबई येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासोबत त्यांची भेट झाली देशाचे स्वातंत्र्य, जातीयता व सुरक्षितता यावर चर्चा  झाली.
  • नेताजी सुभाष चंद्र बोस यांचा मृत्यू :18 ऑगस्ट 1945 रोजी ताईपे या ठिकाणी झाला असावा असे मानण्यात येते.

नेताजी सुभाष चंद्र बोस : स्वातंत्र्य लढा

नेताजी सुभाष चंद्र बोस यांनी सर्वात अगोदर देश बंधू चित्तरंजन दास यांच्यासोबत काम करण्याची इच्छा व्यक्त केली होती. रवींद्रनाथ टागोर व गांधीजी यांचा सल्ला घेऊन ते दास बाबूंसोबत असहकार आंदोलनात सहभागी झाले.

1922 साली  दासबाबूंनी कोलकाता महापालिकेची निवडणूक लढवून जिंकले व महापौर झाले. त्यांनी सुभाष बाबूंना महापालिकेचे प्रमुख कर्मचारी अधिकारी बनवले. सुभाष बाबूंनी आपल्या पद्धतीने काम करून कोलकत्याच्या सर्व इंग्रज रस्त्यांची नावे बदलून भारतीय नावे दिली.

1928 मध्ये काँग्रेसचे वार्षिक अधिवेशन झाले त्यामध्ये पंडित नेहरू यांना खाकी गणवेश परिधान करून लष्करी पद्धतीने सलामी दिली होती या अधिवेशनात स्वराज्याची मागणी करण्याचे ठरवले गेले.

26 जानेवारी 1935 रोजी नेताजी सुभाष चंद्र बोस तिरंगा घेऊन एका मोर्चाचे नेतृत्व केले होते. त्यावेळी त्यांच्यावर लाटी हल्ला झाला व त्यांना तुरुंगवासही झाला.

गांधीजींच्या प्रयत्नानंतर सर्व कैद्यांची सुटका करण्यात आली परंतु भगतसिंग, सुखदेव व राजगुरू यांना मात्र सोडले गेले नाही आणि त्यांना फाशी देण्यात आली. भगतसिंग सुखदेव व राजगुरू यांना गांधीजी व काँग्रेस सरकार वाचवू शकले असते असे सुभाष बाबुंचे मत होते, त्यामुळे ते गांधीजी व काँग्रेस यांच्यावर नाराज झाले.

नेताजी सुभाष चंद्र बोस आणि त्यांचा कारावास

सुभाष बाबूना त्यांच्या संपूर्ण जीवनात एकूण 11 वेळा कारावास भोगावा लागला. सर्वात आधी 1921 ला सहा महिने कारावास भोगावा लागला.

1925 साली गोपीनाथ साहा यांनी एका व्यापाऱ्याला चुकून मारल्याने साहा यांना फाशीची शिक्षा झाली. त्यावेळी सुभाषबाबू खूप रडले व त्यांनी गोपीनाथ साहा यांचे पार्थिव देह मागून त्यावर अंत्यसंस्कार केले. या प्रकारामुळे  इंग्रजांनी त्यांना कोणताही खटला न चालवता मंडाले कारागृहात कैद केले. तेव्हा तेथे त्यांना क्षयरोगाची लागण झाली. पण इंग्रज सरकारने त्यांना भारतात औषध उपचार करण्यास नकार दिला.

त्यांनी त्यासाठी युरोपला जाण्याचा मार्ग सांगितला. सुभाषबाबूंनी इंग्रजांची ही अट मान्य न केल्यामुळे त्यांची तब्येत पूर्ण खालावली. शेवटी नाईलाजाने इंग्रज सरकारने त्यांची सुटका केली व ते डलहौसी येथे जाऊन राहिले. 1930 मध्ये कारावासात असताना त्यांची कोलकत्ता महापौर पदासाठी निवड झाली त्यामुळे त्यांची सरकारने सुटका केली होती.

सन 1938 मध्ये दुसऱ्या महायुद्धाची छाया होती त्यावेळी सुभाष बाबू काँग्रेसचे अध्यक्ष होते. त्यांनी इंग्लंडच्या बिकट परिस्थितीचा फायदा घेऊन आपला लढा वाढवण्याचा ठरवले.

1939 साली सुभाष बाबूंचे अध्यक्ष पद काढून घेतले. काही नेत्यांच्या सांगण्यावरून ही गांधीजींचे मत परिवर्तन झाले नाही आणि शेवटी निवडणूक लढवली गेली. आणि सुभाष बाबू पुन्हा अध्यक्ष झाले. त्यावर्षी अधिवेशनात सुभाष बाबू खूप आजारी होते तरी ते उपस्थित राहिले पण गांधीजी या अधिवेशनात आले नाहीत. गांधीजींनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी सुभाष बाबूंना मदत करण्यास असमर्थता दर्शवली त्यामुळे नाईलाजाने 29 एप्रिल 1939 ला सुभाषबाबूंनी राजीनामा दिला.

सुभाष बाबू ने तीन मे 1939 ला फॉरवर्ड ब्लॉक हा पक्ष स्थापन केला व जनजागृती करून स्वातंत्र्यलढा अधिक तीव्र केला. इंग्रजांनी सुभाष बाबूंना व त्यांच्या सर्व नेत्यांना अटक केली. सुभाष बाबूंनी तुरुंगात उपोषण सुरू केले. त्यामुळे सरकारने त्यांना त्यांच्या घरी नजरकैदेत ठेवले. 16 जानेवारी 1941 ला सुभाष बाबूंनी वेशभूषा बदलून घरातून निसटले ते कोलकत्ता, मोहोळ, पेशावर असा प्रवास करत अफगाणिस्तान मधील काबुल येथे पोहोचले त्यानंतर मॉस्कोमार्गे  बर्लिन येथे गेले.

प्रजासत्ताक दिन

नेताजी सुभाष चंद्र बोस आणि हिटलर यांची भेट

29 मार्च 1942 रोजी सुभाष बाबू जर्मनीचे एडल्ट हिटलर यांना भेटले. पण त्यांनी भारताविषयी कोणतेही स्वारस्य दाखवले नाही. हिटलर यांनी आपल्या आत्मचरित्र मध्ये लिहिले त्यात भारताविषयी अनुदान उद्गार लिहिले त्यावर सुभाष बाबूंनी आक्षेप घेतला तेव्हा हिटलर यांनी त्यांची माफी मागितली व तो भाग वगळला जाईल अशी खात्री दिली. शेवटी हिटलर यांचे सहकार्य मिळणार नाही हे सुभाष बाबूंनी ओळखलं आणि त्यांनी हिंदी महासागरातून मादागार कडून जपानी पानबुडेने इंडोनेशिया येथील पादांग बंदर गाठले.

नेताजी सुभाष चंद्र बोस यांचे नेतृत्व

नेताजी सुभाष बाबू परत आल्यानंतर त्यांनी सिंगापूर येथील फेडरल पार्क मधून भारतीय स्वातंत्र्य परिषदेचे नेतृत्व केले. 21 ऑक्टोबर 1943 ला अर्जी-हुकूमत -ए -आजाद-हिंद ची स्थापना केली व आझाद हिंद फौजेचे सरसेनापती झाले व स्त्रियांसाठी झाशी की राणी रेजिमेंट बनवले व भारतीय लोकांना “तुम मुझे खून दो मै तुम्हे आजादी दूंगा” असा आवाज दिला.

दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी नेताजींनी आपल्या नेतृत्वाखाली इंग्रजांकडून अंदमान व निकोबार बेटे जिंकले पण इम्फाळ व कोहिमा येथे या दोन सेनांना माघार घ्यावी लागली. नेताजींना पळून जाण्यासाठी मार्ग होता पण तसे न करता त्यांनी आपल्या झाशी की राणी या सेनेबरोबर शेकडो मैल पायी प्रवास केला. 6 जुलै 1944 रोजी नेताजींनी गांधीजींना उद्देशून आपल्या जपानकडून मदत मागण्याचा उद्देश व सेनांची स्थापना यामागचे उद्दिष्ट सांगितले. नेताजी सुभाष चंद्र बोस यांनी गांधीजींना सर्वात अगोदर राष्ट्रपिता म्हणून संबोधले. तेव्हापासून गांधीजींना लोक राष्ट्रपिता असे म्हणू लागले.

दुसऱ्या महायुद्धात जपानचा पराभव झाला त्यानंतर नेताजींनी रशियाला जायचे ठरवले. 19 ऑगस्ट 1945 रोजी विमानातून मंचुरिया ला जात असताना ते बेपत्ता झाले असे म्हणतात. 23 ऑगस्ट 1945 रोजी जपानच्या वृद्ध संस्थेने सुभाष बाबूंचे विमान दुर्घटनेत निधन झालेले जाहीर केले. त्यांच्या सहकाऱ्यांनी सुभाष बाबूंना वाचवण्याचा खूप प्रयत्न केला पण यश आले नाही. त्यांच्या अस्थी जपानच्या रेनकोजी नावाच्या बौद्ध मंदिरात ठेवल्या गेल्या.

1956,1977 व त्यानंतर 1999 ला मुखर्जी आयोग असे तीन आयोग सुभाष बाबूंचा प्रवास व मृत्यूचे गुड उकलण्यात प्रयत्न करत होते. शेवटी 2005 मुखर्जी सरकारने अपघात झाले नसलेचा अहवाल सादर केला.भारत सरकारने हा अहवाल फेटाळला. सुभाष बाबू कसे बेपत्ता झाले हे एक रहस्य बनून राहिले आहे.

भारतीय स्वातंत्र्य लढ्यात जहालपणे सहभागी होणाऱ्या अशा या महान नेत्यास कोटी कोटी प्रणाम!

 

 

 

 

Leave a Comment