Site icon Chhoti Khabar

नवीन वीज कनेक्‍शन आता घरबसल्या घ्या! कसे?

नवीन वीज कनेक्‍शन

नवीन वीज कनेक्‍शन आजच्या जीवनात ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. तुमच्या घरात टीव्ही, मोबाईल, मिक्सर, रेफ्रिजरेटर, वॉशिंग मशिन, कॉम्प्युटर, लॅपटॉप, मायक्रोवेव्ह अशा अनेक गोष्टी आयुष्यासाठी अत्यावश्यक आहेत. आजकाल वाहने सुद्धा इलेक्ट्रिक झाली आहेत. आणि शेतीसाठी लाईट खूपआवश्यक आहे. आज आपण पाहूया घरगुती वीज कनेक्‍शन साठी काय करावे आणि कुठे अर्ज करावा ? हा फॉर्म आपण मराठी किंवा English मधून घरबसल्या भरू शकतो.

नवीन वीज कनेक्‍शन साठी कुठे अर्ज करावा ?

जर तुमच्या घरी लाईट कनेक्शन घ्यायचे असेल,तर तुम्ही तुमच्या मोबाईल,लॅपटॉपवरून घरी बसून अर्ज करू शकता. महावितरणच्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल. त्यासाठी येथे क्लिक करा.तुम्हाला असा इंटरफेस दिसेल.

लाईट कनेक्‍शन

 

सर्व माहिती काळजीपूर्वक वाचायची आहे. आता तुम्हाला पाच पर्याय दिसतील त्यातील पुढीलप्रमाणे योग्य पर्याय निवडा.

नवीन वीज कनेक्‍शन अर्जाची सविस्तर माहिती

PM Kisan Registration number :5 मिनिट में कैसे निकाले?

नवीन वीज कनेक्‍शन बिलाची माहिती

बिलाची माहिती यामध्ये तुम्हाला बिलाचा आणि मीटरचा पत्ता सारखा असेल तर दिलेल्या चेक बॉक्समध्ये टिक करा आणि वेगळा असेल तर तो भरून घ्या.

मला ग्रो ग्रीन सर्विस ची निवड करायची आहे ? होय/ नाही निवडा. होय निवडल्यायास मध्ये आपणाला फक्त online बिल पाठवले जाते. त्या बदल्यात आपल्या बिलामध्ये १० रुपये कामी केले जातात. आपल्या बिल प्रत्यक्ष हवे असल्यास नाही हा पर्याय निवडा.

बहुपक्षीय त्रिपक्षीय ग्राहक आहे का ? तर नाही निवडा.

कृपया पेमेंट साठी पर्याय निवडा. यामध्ये तुम्हाला फक्त प्रक्रिया शुल्क हाच पर्याय निवडायचा आहे.

लिहा Required Load आपोआप येवून जाईल.

दिलेल्या अटी मला मान्य आहेत या समोरील चेक बॉक्स मध्ये टीक करून ठिकाण लिहा व ओटीपी व्युत्पन्न करा वर क्लिक करा. तुमच्या मोबाईल व ईमेल वरती एक ओटीपी पाठवला जाईल तो ओटीपी भरून नोंद करा (Save) वर क्लिक करा.

तुमच्या समोर एक Application ID जनरेट होईल तो लिहून घ्यायचा आहे. व OK वर क्लिक करा.

नवीन वीज कनेक्‍शन आवश्यक कागदपत्रे

  1. आधार कार्ड, पॅनकार्ड, मतदान कार्ड, लायसन्स, पासपोर्ट यापैकी किमान १
  2. रेशन कार्ड, असिसमेंट, 200 रुपयाचा स्टँपवर प्रतिज्ञापत्र, खरेदी-विक्री करारपत्र यापैकी किमान एक
  3. टेस्ट रिपोर्ट+फोर्म डी अपलोड करा.

आता तुमच्यासमोर सर्व माहिती येईल तिथे Upload Document ला क्लिक करा.

Upload All Document यावर क्लिक करा. Document Uploaded Sucessfuly असा मेसेज येईल.

आता तुमच्यासमोर नवीन पेज येईल येथे Application No. किंवा mobile No.टाकायचा आहे व Captcha भरून Click Here वर क्लिक करायचे आहे. तुमच्या मोबाइल वर OTP येईल तो OTP भरून Submit वर क्लिक करा. तुमची अर्जाची प्रिंट Open होईल त्याची प्रिंट काढून घ्यायची आहे.

पेमेंट Successful झाल्यावर तुम्हाला पेमेंट Receipt प्राप्त होईल त्याची प्रिंट काढून घ्यायची आहे व असणारे सर्व कागदपत्रे आणि अर्जाची प्रिंट तुमच्या जवळच्या महावितरणच्या कार्यालयात द्यायची आहेत.

धन्यवाद!

 

 

 

 

 

Exit mobile version