कडबा कुट्टी यंत्र हवंय?: मग 2024 साठी असा करा अर्ज!

आपले सरकार अर्थात महाडीबीटी फार्मर च्या कृषी यांत्रिकीकरण अभियान या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी कडबा कुट्टी व अनेक नवनवीन यंत्रासाठी अनुदान देण्यात येते. जसे स्वयंचलित यंत्रे, फळासाठीचे यंत्रे, वैशिष्ट्यपूर्ण यंत्रे, काढणी यंत्र, प्रक्रिया संच, मनुष्यचलित व बैलगाडीचलित यंत्रे, ट्रॅक्टर, पावर टेलर व त्याचे अवजारे अशांसाठी अर्थसहाय्य दिले जाते. आज आपण या पोस्टमध्ये कडबा कुट्टी साठी अर्ज कसा करायचा हे पाहणार आहोत.

कडबा कुट्टी अर्जासाठी रजिस्ट्रेशन व लॉग इन करण्याचे टप्पे

महा DBT च्या शेतकऱ्यांसाठी मिळणाऱ्या कडबा कुट्टी यंत्रासाठी अर्थसहाय्याचा लाभ घेण्यासाठी आपल्याला mahadbt.Maharashtra.gov.in या अधिकृत वेबसाईटवर जायचे आहे.

कडबा कुट्टी
कडबा कुट्टी

येथे आल्यावर तुम्हाला उजव्या बाजूला असणाऱ्या नवीन अर्जदार नोंदणी यावर क्लिक करायचे आहे. त्यानंतर तुम्हाला अर्जदाराचे पूर्ण नाव भरायचे आहे. वापरकर्त्याचे नाव मध्ये तुम्ही चार ते पंधरा अक्षरांमध्ये एखादे नाव/शब्द भरून पासवर्ड मध्ये तुम्हाला आठ ते दहा अक्षरांचा पासवर्ड बनवायचा आहे आणि पासवर्ड CONFIRM करायचा आहे.

युजर आयडी मधील नाव किंवा शब्द वापरून पासवर्ड बनवू शकत नाही.

खाली तुमचा E-mail हा पर्याय बंधनकारक नाही तर तुम्ही मोबाईल नंबर टाकून ओटीपी पाठवा वर क्लिक करा.तुमच्या मोबाईलवर एक ओटीपी पाठवला जाईल. तो ओटीपी भरून ओटीपी तपासा वर क्लिक करा.तुमचा मोबाईल नंबर सत्यापन यशस्वी झालेचा मेसेज येईल. त्यावर क्लिक करा नंतर कॅपच्या भरून घ्या व नोंदणी करा यावर क्लिक करा. तुमचं रजिस्ट्रेशन पूर्ण झाल्यावर तुम्ही पुन्हा होम पेजवर याल. येथे तुम्हाला युजरनेम (वापरकर्ता), पासवर्ड (password) व कॅपच्या भरून लॉगिन करायचं आहे.

कडबा कुट्टी साठी आधार नोंदणी

कडबा कुट्टी यंत्रासाठी नोंदणी करताना आधार कार्ड असणे आवश्यक आहे.

 • येथे तुम्हाला विचारले जाईल शेतकरी गट किंवा संस्था म्हणून नोंदणी करताय तर तुम्ही नाही पर्यावर क्लिक करा.
 • तुमच्याकडे आधार क्रमांक आहे का ? तर होय वर क्लिक करा व तुमचा आधार नंबर द्या
 • जर तुमचा आधार ला मोबाईल नंबर लिंक असेल तर ओटीपी हा पर्याय निवडा अन्यथा बायोमेट्रिक पर्याय निवडून तुम्ही लॉगिन करू शकता. 
 • मोबाईलवर ओटीपी पाठवल्यानंतर तो ओटीपी भरून तपासून घ्या वर क्लिक करा.तुमची आधार नोंदणी यशस्वीरित्या पूर्ण झालेली आहे असा मेसेज येईल.

कडबा कुट्टी साठी प्रोफाईल भरा

आता तुम्ही लॉगिन पेजवर याल येथे तुम्हाला तीन स्टेप मध्ये तुमची प्रोफाइल पूर्ण करायची आहे.

 • पहिली स्टेप वैयक्तिक माहिती असेल यामध्ये काही माहिती अगोदर आलेली असेल.
 • पुढची माहिती पहिले नाव वडिलांचे किंवा पतींचे नाव भरून घ्या.
 • पॅन क्रमांक टाकून घ्या.
 • जात तपशील मध्ये तुम्हाला तुमची वर्गवारी निवडायची आहे.
 • अपंग आहे का ? होय/नाही यापैकी योग्य पर्याय निवडा.
 • बँक तपशील मध्ये तुम्हाला तुमचे आधार जोडलेले बँक खाते हे जनधन युवक खाते आहे का किंवा खात्यातून पैसे काढण्याची किंवा ठेवण्याचे मर्यादा आहे का येथे तुम्हाला योग्य पर्याय निवडायचा आहे.
 • आपला बँक खाते क्रमांक व्यवस्थित टाकायचा आहे.
 • तुमचा बँकेचा आयएफसी कोड नंबर टाका. (हा आपल्याला बँक पासबुक वर मिळेल.) त्यानंतर शाखेचे नाव आपोआप येऊन जाईल.
 • संमती असलेला चेक बॉक्स वरती टिक करून जतन करा वर क्लिक करायचे आहे.

माहिती यशस्वीरीत्या पूर्ण झालेला मेसेज येईल OK वर क्लिक करा.

कडबा कुट्टी : पुढची स्टेप आहे पत्ता :

तुमचा आधार कार्डवर जसा पत्ता आहे. प्रथम तुमचा वॉर्ड नंबर, गल्ली, गाव टाका व पुढे राज्य, जिल्हा, तालुका, गाव निवडून पिन कोड भरून घ्या.आता तुम्हाला पत्र व्यवहाराचा व कायमचा पत्ता एक आहे का असे विचारले जाईल होय करा अन्यथा वेगळा पत्ता असेल तर क्लिक करून तो भरून घ्या व जतन (save) करा वर क्लिक करा.

आता तुमच्या शेत जमिनीचा तपशील भरायचा आहे

 • आपल्याकडे एकापेक्षा अधिक गावांमध्ये जमीन आहे का असेल तर होय करा अन्यथा नाही करा.
 • राज्य, जिल्हा, तालुका, गाव/ शहर निवडा.
 • ८ अ खाते क्रमांक व क्षेत्र टाका ( वर दिलेल्या गावासाठीचा )
 • तुमचे ८ अ एकापेक्षा जास्त असतील तर मध्ये स्वल्पविराम देऊन दुसरा, तिसरा असे भरून घ्या.

पी एम किसान सन्मान योजनेच्या माहितीसाठी इथे क्लिक करा.

सातबारा उतारा तपशील

 • सर्वेक्षण क्रमांक/ गट क्रमांक यामध्ये एक गट नंबर भरा.
 • वैयक्तिक मालकी यामध्ये तुमचा वैयक्तिक क्षेत्र किती आहे ते भरा
 • संयुक्त मालकी यामध्ये संयुक्त असेल तर ती भरून घ्या
 • सामायिक मालकी यामध्ये सामायिक क्षेत्र भरून घ्या.
 • सिंचनाखालील क्षेत्र असेल तर क्षेत्र टाकून घ्या व जतन करा.

आता त्याच गावात दुसरा गट जोडायचा असेल तर दुसरा गट नंबर टाकून पुन्हा त्याची सर्व माहिती भरायची आहे व जतन करायचं आहे माहिती पूर्ण भरून झाल्यावर पुढे जा वर क्लिक करा.

पिकांचा तपशील

यामध्ये तुम्हाला तालुका, गाव/ शहर, गट नंबर, हंगाम, पीक प्रकार व पीक निवडा अशा प्रकारे सर्व गट नंबर याप्रमाणे भरून जतन करत जा. एका गावातील शेतीची माहिती भरून झाल्यावर दुसऱ्या गावातील शेतीची माहिती भरून घ्यायची असेल तर पुढे जा वर क्लिक करा व  तुमच्या पिकांची माहिती पूर्ण भरून घ्या व इतर माहिती सादर करा वर क्लिक करा.

सिंचन स्त्रोत

आता तुम्हाला सिंचन स्रोत निवडायचा आहे. ऊर्जा स्रोत > सिंचन सुविधा > उपकरणे जोडा यावर क्लिक करा. इलेक्ट्रिक मोटर असल्यास एचपी व त्याची संख्या टाका रेकॉर्ड यशस्वी जतन झाले असा मेसेज येईल.अशा प्रकारे सर्व माहिती तुम्ही ऍड करू शकता. आता तुम्हाला मुख्यपृष्ठावर यायचा आहे. येथे तुम्हाला अर्ज करा वर क्लिक करायचा आहे यामध्ये कृषी यांत्रिकरण या समोर बाबी निवडा वर क्लिक करा.

 • मुख्य घटकांमध्ये तुम्ही कृषी यंत्र अवजाराच्या खरेदीसाठी अर्थसहाय्य हा पर्याय निवडा
 • तपशील यामध्ये तुम्ही ट्रॅक्टर पावर टिलर चलित अवजारे हा पर्याय निवडा
 • एचपी श्रेणी निवडा मध्ये वीस एचपी पेक्षा कमी हा पर्याय निवडा
 • यंत्रसामग्री अवजारे उपकरणे यामध्ये तुम्ही फॉरेज/ ग्रास अँड स्ट्रॉ/ रेसिड्यू मॅनेजमेंट (कटर /श्रेडर ) रेसिडेंट हा पर्याय निवडा
 • मशीनचा प्रकार मध्ये तुम्हाला कडबा कुट्टी थ्री एचपी च्या आतील हा पर्याय निवडायचा आहे.

जर तुम्हाला मनुष्य चलित कडबा कुट्टी साठी अर्ज करायचा असेल तर पर्याय क्रमांक दोन हा मनुष्यचलित अवजारे निवडून चाफ कटर above 3 किंवा चाफ कटर up to 3 यातील योग्य तो पर्याय निवडून जतन करायचं आहे.

त्यानंतर तुम्ही मुख्य पानावर या. येथे अर्ज सदर करा यावर क्लिक करा. आलेल्या मेसेज ला OK करा. पुन्हा पहा वर क्लिक करा. पुढे प्राधान्य क्रम निवडा. आपला संपूर्ण अर्ज पुन्हा एकदा तपासा. संपूर्ण माहिती बरोबर असल्याची खात्री करून अटी व शर्ती मान्य आहेत च्या समोरील बॉक्स वर क्लिक करा आणि अर्ज सदर करा वर क्लिक करा.

कडबा कुट्टी यंत्रासाठी किती payment करावे लागेल?

वरील सर्व माहिती भरून पूर्ण झाल्यानंतर सर्वात शेवटी आवश्यक रक्कमेचे payment करावयाचे आहे. यासाठी  MAKE PAYMENT वर क्लिक करायचे आहे. आपल्या समोर payment साठी निरनिराळे पर्याय दिसतील. त्यातील योग्य पर्यायाची निवड करा. त्यासाठी आवश्यक माहिती जवळ ठेवा. आवश्यक ती सर्व माहिती भरा.

योग्य पर्याय निवडून २३.६० रुपयाचे पेमेंट करून घ्यायचे आहे. Payment सुविधा फक्त ऑनलाईन पद्धतीने आहे. Payment नंतर एक पेमेंट रिसीट येईल ते DOWNLOAD करून घ्यायचे आहे. ते जतन करून ठेवा.

 

Leave a Comment